रविवार, २१ जानेवारी, २०२४

माणूस म्हणून जगण्याचा संघर्ष !




    महाराष्ट्र माझी माय भूमी, या महाराष्ट्राच्या मातीने मला कष्ट करायला शिकवले. सत्याची कास धरून वागायला शिकवले. समानता शिकवली. माणुसकी शिकवली. शिव, फुले ,शाहू ,आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श मला इथूनच मिळाला. पण आजकाल माझा जीव घुसमटतोय. प्रबोधनाची परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील एक तरूण आज विचारांच्या लढाईत थंड पडतोय. या महापुरुषांच्या विचारांनी मला स्वातंत्र्य, समता, बंधुता व लोकशाही या मूल्यांना धरून आयुष्य जगण्याची प्रेरणा दिली. धर्म,  जात, पंथ व भाषा यांच्या बेड्या तोडून मला एक माणूस म्हणून जगण्याचा विचार दिला. पण आजकाल जे आजूबाजूला वातावरण बघतोय.  की येवढा कसा हा उच्च निच्च पणा शाळेतील शिक्षक असा प्रश्न विचारतात की तुमची जात कोणती आहे. तुम्ही हलक्या जातींचे की वरच्या जातींचे त्यावरून ते ठरवणार की समोरच्याशी कसं बोलायचं. धर्म हा तर लोकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला दिसतोय. त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. फक्त आणि फक्त धर्म वाचवायचा. आणि हे प्रमाण सर्वात जास्त तरूण पिढीतील युवक आणि युवती मध्ये बघायला मिळतंय. चांगलं शिक्षण,  आरोग्य यांची कोणालाच काही पडली नाही असं सगळं वातावरण या समाजात निर्माण होताना दिसतंय. कालांतराने असं वाटतयं की धर्मच हा यांना सगळ्या काही जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करेल. एकमेकांकडे बघण्याची दृष्टी बदलायला लागली आहे. जातिव्यवस्था हजारों लाखों वर्षांपासून समाजाच्या मानगुटीवर बसलेली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात

भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.!

बाबासाहेबांचा हा विचार अजुन पण तेवढाच खरा ठरतोय. अजुन सुध्दा जातीच्या नावावर एकमेकांना उच्च तुच्छ लेखणे कमी झालेलं नाही.देशात सर्वात जास्त या जाती व्यवस्थेमुळे लोक एकमेकांपासून दूर गेले. आणि हा देश एकसंघ झाला नाही. इंग्रजांनी सुध्दा फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. कारण त्यांना माहित होते. की हे लोक जातीच्या - धर्माच्या नावावर एकमेकांचा जीव घ्यायला पण कमी करणार नाहीत. आणि यांचा फायदा त्यांना झाला. तब्बल दीडशे वर्षं इंग्रजांनी देशावर राज्य केलें. का तर आपला समाज हा जातिव्यवस्थेच्या विलाख्खात अडकलेला आहे. पण ही जातीव्यवस्था अजुन पण संपलेली नाही. दररोजच्या जीवनात जगत असताना ह्या जातींचा उल्लेख झाल्याशिवाय माणूस राहत नाही.शिक्षणा पेक्षा धर्म श्रेष्ठ झालायं. मला कोणाच्याही श्रध्देचा अवमान अजिबात करायचा नाही. पण देशात जे वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे खरंच विचार येतोय. असंच सुरू राहिलं तर देश अजुन किती मागे जाईल. भोळ्या भाबड्या लोकांच्या भावनांचा वापर करून देशांची शिक्षणव्यवस्था हे राजकारणी मातीत तर घालणार नाही ना यांचा विचार येतोय. हा माणूस म्हणून जगण्याचा संघर्ष कधी थांबेल. एकमेकांना माणूस म्हणून बघण्याची दृष्टी या समाजात कधी निर्माण होईल. आणि माझा देश खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष कधी होईल.!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माणूस म्हणून जगण्याचा संघर्ष !

    महाराष्ट्र माझी माय भूमी, या महाराष्ट्राच्या मातीने मला कष्ट करायला शिकवले. सत्याची कास धरून वागायला शिकवले. समानता शिकवली. माणुसकी शिकव...