सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

प्रिय निसर्गा


प्रिय,
निसर्गा ,


विषय:- आजपर्यंत जे आयुष्य दिलंय त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे बाबत....

     मी तुझ्याच पासून तयार झालेला एक जीव.ज्याला तु आकार दिला. जीवनावश्यक सर्व काही दिलं.या पृथ्वीतलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव तुझ्याच मुळे हे सुंदर असं विश्व बघू शकतो. तु आहेस येवढा अद्भुत की तुझ्याकडे बघताना माणूस सर्व काही विसरून तुझाच होऊन जातो. 
तुझ्या पुढे फिके पडतात ते दु:ख. जे दुःख खुप 
यातना देतात. जे माणसाला रडवतात. जर तुझ्या प्रेमाचा विचार केला तर तु कधीच स्वतः चा स्वार्थ बघितला नाही.
 निस्वार्थी होऊन तु प्रत्येक जीवावर प्रेम करतोस. तु येवढा हद्दयस्पर्शी आहे ना, की फक्त तुझ्यात आयुष्य व्यतीत करावसं वाटतं. प्रत्येक दु:खाला दूर करण्याचे कारण तु आहे.

       निसर्गा तु येवढा शुद्ध आहे. की तुझ्या येवढी शुध्दता कशातच दिसतं नाही. तु कधीच तुझ्याकडे काही मागणाऱ्याना नाही म्हणत नाही. आजपर्यंत तु प्रत्येकाला भरभरून दिलं. आणि कोणतंही अपेक्षा न ठेवता. ज्या मानवाला तु तयार केलं त्याला का शिकवत नाही.तु कोणतीही अपेक्षा न ठेवता जगायचं. तु येवढा मनमोहक आहे ना की फक्त तुझ्या सहवासात जगावंस वाटतं. येवढं आकर्षित कसा करतोस रे. सगळं काही विसरून तुझाच व्हावंसं वाटतं कधी कधी. तुझ्या पासूनच माझी सुरूवात झाली. आणि शेवटी तुझ्यातच विलीन व्हायचं मला. तु आजपर्यंत येवढं काही दिलंय तरी त्यातलं कांहीच परत नाही मागितलं. तु खुप प्रेमळ आहेस. जो प्रत्येकाला खुप जीव लावतो. तुझी माफी पण मागावी म्हणतोय. ज्यांच्या निर्मितीचे कारण तु आहे. त्यानेच तुला नष्ट करण्याची शपथ घेतली असं वाटतंय. तरी तु त्याला जे हवंय ते देतोय. तुझ्या सारखं निस्वार्थी कोणी असेल का हा माझ्या मनात नेहमीच प्रश्न पडतो. मी तुला माझ्या आयुष्यातील दु:ख दूर करण्याचं साधनं मानतो. हो तुझ्या सहवासात राहिलं की मी सर्व काही विसरून जातो. तु आहेस म्हणून मी आहे. आणि या विश्वात असलेला प्रत्येक जीव आहे.तुझी कृतज्ञता व्यक्त करताना खरंच मनात अश्रू येतात. कोणी तुझ्या साठी का रडत नसेल. तु तर प्रत्येकाला हवंय ते देतो. मग तुझा विचार कोणी का करत नसेल. माफ कर त्या सर्वांना ज्यांना तु  सर्व काही देऊन तुला विसरले.आणि धन्यवाद तुझं तु मला हे सर्व सुंदर असं विश्व दाखवलं. जे खुप आश्चर्यकारक असं आहे.

कृतज्ञतापूर्वक
तुझाच एक अंश 
    अनिकेत शारदा श्रीराम

माणूस म्हणून जगण्याचा संघर्ष !

    महाराष्ट्र माझी माय भूमी, या महाराष्ट्राच्या मातीने मला कष्ट करायला शिकवले. सत्याची कास धरून वागायला शिकवले. समानता शिकवली. माणुसकी शिकव...