प्रिय,
माननीय पञ
मनातल्या भावना ,शब्दरूपी वाट
विषय:- प्रेमाच्या भावना व्यक्त करताना...
प्रिय पञा,
मी अनिकेत , तुझ्या रूपाने माझ्या भावना इतरांपर्यंत पोहचवणारा शब्दांचा वाटसरू, मला आज अचानक तुझी आठवण झाली आणि डोळे पाणावले. काय माहित पण तु मनाला खुप सुखावतो तुझ्या येण्याने मनामध्ये खुप आत्मियता जागृत होते. तुझ्या शब्दांच्या रूपांमध्ये मला माझ्या वरती प्रेम करणाऱ्या माणसाची आठवण होते. मला सुद्धा आज तुझ्यावर प्रेम जडलय. हो तुझ्या मार्फत आजपर्यंत किती तरी मनाची बंधने एकमेकांशी जोडली गेली. आणि काहींच्या सुख दुःखाच्या भावनांची तु सुध्दा दळणवळण करत आलास तुझ्या ह्या निस्वार्थी प्रेमाची साक्ष तो कागद आणि शाही सुध्दा देते. जे तुझ्या आयुष्याचे भाग आहेत. खरंच तुझ्यावर प्रेम करावसं वाटतं असा आहेस तु .मनाला आनंद देणारा, आधार देणारा, तुझ्यामुळे शब्द हे बोलके वाटायला लागतात. तुझ्यासाठी मी हे लिहतोय हे यासाठी की,आजकाल तुझं दिसणच हल्ली बंद झालंय. तुझ्या शब्दांच्या प्रेमात पडायचं मला पडशील ना माझ्या प्रेमात ?
मला तु सतत भेटतं रहावं असं वाटतं माझी ही इच्छा पूर्ण करशील यांची मला खात्री आहे.
तुझा प्रिय,
अनिकेत ( अनु)