सोमवार, २५ जुलै, २०२२

चिंतेला अग्नी द्यायला मुलगा हवा

आपल्या देशात खुप आधीपासून ही प्रथा आहे.की मुलगाच हा घराचा वारस असावा.आणि त्याने घरांच्यानाआधार द्यावा.तो घरातल्यांना सांभाळून शकतो.मुलगी ही तर परक्याच धन आहे.असा विचार आपल्या देशामध्ये अजुन पण कमी नाही झाला.जरी आपला देश विज्ञानवादी असला तरी पण अजुन पण देशांमध्ये सनातनी विचारांचा प्रभाव तसाच दिसून येतो.कधी त्या मुलीचा हुंड्यासाठी जीव घेतला जातो तर कधी तिचा गर्भातच तिला मारून टाकल्या जात.एकीकडे मुलगी शिकली प्रगती झाली.अशा बोंबाबोंब करणारे लोक आणि त्याचं देशात स्ञी पुरूष समानता असून पण त्या स्त्रीला तुच्छ लेखून तिला घर आणि स्वयंपाक घरापर्यंत मर्यादित ठेवायचं.हे अजुन पण कमी नाही झालं.ती शिकली मोठी झाली.पण शेवटी तिच्या नशिबी तेच जे हजारो वर्षांपासून चालत आलंय.चिंतेला अग्नी द्यायचा म्हणून मुलगा हवा या धार्मिक अंधश्रद्धेमुळे 'मुलगी' पेक्षा 'मुलगा' आपल्या समाजात हवा असतो.कुटुंबाला मुलगाच असतो यांची कारणे, सामाजिक धार्मिक तसे आर्थिक ही आहे.आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.बहुसंख्य लोक हे शेतीवर अवलंबून आहे. व शेती करण्यासाठी सध्याच्या समाजव्यवस्थेत मुलगा आवश्यक मानल्या जातो. हुंड्या सारखा न पटणाऱ्या गोष्टी मुळे मुलगी ही नकोशी वाटते.कोणाला पण अगोदर मुलगाच हवा असतो._विज्ञान-तंञज्ञान_ यामुळे माणूस प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.पण हेच _विज्ञान-तंत्रज्ञान_ समाजात असलेले अधश्रध्द घटक, आपल्या स्वार्थासाठी व आपल्या फायद्यासाठी फायद्यासाठी त्यांचा दुरूपयोग करत आहे.गर्भलिंग निदान बेकायदेशीर असताना व त्यासाठी कडक कायदे करून पणसोनोग्राफी करणारे तज्ज्ञ डॉक्टर हे पैश्या च्या आहारी गेल्यामुळे 'मुलगा' आहे की 'मुलगी' हे सांगतात.स्वतः च्या स्वार्थासाठी व पैशांच्या मोहापायी येवढे भुकेला लागले आहे.की, त्यांना त्या चिमुकल्या लहान मुलीचा जीव काहींच वाटत नाही.कुटुंबाच्या इच्छेप्रमाणे स्ञी गर्भ ओळखला जातो. व मुलगी आहे.समजताच बेकायदेशीर रीत्या फक्त पैशांच्या च्या पायी नीच वृत्ती व मानसिकता ठेवून तिच्या घरचे व ते डॉक्टर तिचा पोटातच जीव घ्यायचा. एकीकडे आपल्याच देशात गाय मारू द्यायचीनाही ,धर्मश्रद्धेपोटी ,बोकड मारू द्यायचं नाही , जीवदया म्हणून मांसाहारी करणे चुकीचे आहे.गळ्यात माळ घालायची.आणि येवढा मोठ्या धार्मिक विचारांचे आपण आपलीच 'मुलगी' किंवा 'नातं' सोनोग्राफी करून ओळखून त्या नंतर तिचा त्या गर्भातच जीव घ्यायचा.इथे आपली मानवता, प्रेम, माणुसकी,कुठे मरून जाते काय माहित सतत लोकांना ज्ञानाच्या गोष्टी सांगणारे आपण मांसाहार करून मुक्या जनावरांचा जीव नका घेऊ म्हणून लोकांना ज्ञान देणारे आपण आपल्याच मुलींचा किंवा नाती चा गर्भातच जीव घेतो ही किती केविळवाणी गोष्ट आहे.अशा गोष्टी आपल्या भारतीय समाजाचे भीषण वास्तव आहे.स्ञी चे शिक्षण आपल्या समाजात ,विशेषतः मी खुप अनुभव घेतला या गोष्टीचा ग्रामीण भागात फार लवकर _स्ञी-शिक्षण_ हे लवकर आटोपले जाते.एका निरिक्षणात मी असं सिध्द झालं की , एकतृतियांश ग्रामीण स्ञीया आठवी इयत्तेपुढे शिक्षण घेतात असे आढळून आले आहे. या मुलींचे वय:१६-१७ व्या वर्षी लग्न लावून दिले जाते.हुंड्यासाठी खुप अशा मुलींना ञास सहन करावा लागतो. काही स्ञीया तर  फाशी देऊन किंवा त्यांचा गळा दाबून अंगावर पेट्रोल किंवा रॉकेल ओतून जीव घेतला जातो अशा बऱ्याच घटना ऐकलेल्या आहे आणि ही सगळ्यात भयानक व निशब्द करून टाकणारी दु:खत स्थिती आपल्या समोर आहे.हे एक भयानक वास्तव आपल्या समोर आहे.जिथे गर्भलिंग परिक्षणाने स्ञीचे गर्भ ओळखून, गर्भ अवस्थेत तिला खुडुन टाकण्याची व तिचा त्या गर्भातच जीव  घेण्याची पध्दत रूढ झाली. त्या देशात कधी बदल होईल अजुन पण ती मानसिकता घेऊन लोक जगत आहेत.आतापर्यंत शिक्षण घेऊन खुप मुली मोठ्या झाल्या. पण अजुन पण लोकांच्या मनांतील ती नीच वृत्ती नाही गेली.ज्या आईंच्या पोटी जन्म घेतो.व त्या आईमुळे हे जग बघायला भेटलं त्याचं आईसाठी आपल्या ला मुलगी आवश्यक आहे .असं का नाही वाटत?मुलगी झाली म्हणून दु:ख वाटते.आणि आम्ही स्ञी-पुरूष समानता पाळणारे फक्त ते नावापुरतेच मर्यादित ठेवलं.कधी त्यांचा विचार केलाच नाही.आपल्या देशात अजुन पण ही मानसिकता बदलली नाही.आता तरी बद्दल हावा हीच इच्छा..!
_#विचाराच्या _ पलीकडे_
अनिकेत शारदा श्रीराम 
सावरगाव माळ, मातृतीर्थ सिंदखेडराजा, बुलढाणा

माणूस म्हणून जगण्याचा संघर्ष !

    महाराष्ट्र माझी माय भूमी, या महाराष्ट्राच्या मातीने मला कष्ट करायला शिकवले. सत्याची कास धरून वागायला शिकवले. समानता शिकवली. माणुसकी शिकव...